सप्टेंबर ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांच्या मासिक कार्यक्रमाचं हे 68 वे संस्करण होते. या भागात मोदी यांनी संपुर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्र आणि पौष्टिकतेचे खूप चांगले नाते आहे. आपल्यात एक म्हण आहे - ‘ यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजे जसे आपले अन्न असते, त्या प्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. पोषण किंवा न्यूट्रिशन याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहात, आपण किती खात आहोत, किती वेळा आपण खात आहोत. याचा अर्थ आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी भारतीय कृषी कोष’ तयार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणते धान्य पिकते त्याची उपयोगिता किती आहे. याची सर्व माहिती दिली जाणार आहे. याशिवाय मोदी यांनी आपल्या संबोधनात मुलांची खेळणी स्वदेशात तयार करावी, याचाही उल्लेख केला आहे.